Indurikar Maharaj on Corona Vaccination : लस घेतली नाही, घेणारही नाही : इंदुरीकर महाराज
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कोरोनावरच्या लशीबद्दल एक विधान करुन भुवया उंचावल्या आहेत. मी लस घेतली नाही, आणि घेणारही नाही. असं विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातल्या घोटीमध्ये झालेल्या सभेत केलं आहे. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१ व्या जयंती निमित्ताने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पाचशेहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ईतर महाविकास आघाडीचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते.
Tags :
Corona Vaccination Vaccination Corona Indurikar Maharaj Kirtankar Kirtankar Indurikar Maharaj