Voter List Row: 'लोक खुश आहेत, Rahul Gandhi रडत आहेत', केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा टोला
Continues below advertisement
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवरून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'मतदार यादीच्या शुद्धीकरणाने जनता आनंदी आहे, पण राहुल गांधी रडत आहेत', अशा शब्दांत रिजिजू यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेने पार पडते आणि प्रत्येक राजकीय पक्षाचे एजंट मतदान आणि मतमोजणीवेळी उपस्थित असतात, असे रिजिजू म्हणाले. काही गडबड वाटल्यास निवडणूक आयोगाकडे किंवा न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध असताना काँग्रेस केवळ पत्रकार परिषदा घेऊन निराधार आरोप करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. पूर्वी काँग्रेसच्या काळात सरकारच न्यायाधीश आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असे, तरीही भाजपने कधीही लोकशाहीवर अविश्वास दाखवला नाही, याची आठवणही रिजिजू यांनी करून दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement