Infra Politics : अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरून राजकारण तापलं, आजी-माजी खासदार आमनेसामने
Continues below advertisement
अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या (Ahilyanagar-Manmad Highway) रखडलेल्या कामावरून अहिल्यानगरचे विद्यमान खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 'मी लोकांना सत्य सांगत होतो पण तेव्हा ठराविक लोकांनी अभास निर्माण केला की नगर पाथर्डी माझ्या उपोषणामुळे सुटलं, तर मग तुमच्या उपोषणामुळे नगर मनमाड सुटला पाहिजे होता,' असा थेट सवाल करत सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. पराभवानंतर आता निवडून आलेल्या खासदारांनी उत्तर द्यावं, असंही विखे म्हणाले. त्याला उत्तर देताना निलेश लंके यांनी कामाच्या दिरंगाईचा घटनाक्रम सांगितला. आधीच्या दोन ठेकेदारांना तांत्रिक कारणांमुळे आणि ब्लॅकलिस्ट झाल्यामुळे काम सोडावे लागले, असं ते म्हणाले. आता तिसऱ्या टेंडरनंतर काम सुरू झाले असून ते आपल्याच काळात सुरू झाले आणि आपल्याच काळात पूर्ण होईल, असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement