Khed Shivapur 5 Crore Seized : काय गाडी, काय पैसे, जनता म्हणते, नॉट ओक्के Maharashtra Election

खेड शिवापूर टोलनाक्यावर इनोव्हा गाडीत सापडलेल्या ५ कोटींच्या रकमेशी आपला संबंध नसल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय... ज्या गाडीत ५ कोटी रुपये पकडले त्या गाडीत शहाजीबापू पाटलांचा नातेवाईक सागर पाटील आणि निकटवर्तीय रफिक नदाफ होते.. शहाजीबापू गुवाहाटीला असताना "काय झाडी, काय डोंगर" हा संवाद याच रफिक नदाफसोबत झाला होता.. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गाडीत बाळासाहेब आसबे आणि शशिकांत कोळी या आणखी दोन व्यक्ती होत्या..

खेड शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोख रक्कम सापडल्यानंतर रोहित पवारांनी एक व्हिडीओ ट्विट केलाय.. हा व्हिडीओ खेड शिवापूर टोलनाक्यावरचाच असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय... सत्ताधारी उमेदवारांना २५ कोटीचा पहिला हफ्ता मिळाला अशी खोचक टीका रोहित पवारांनी केलीय... एकच गाडी सापडली आहे, आणखी चार गाड्या कुठे आहेत असा सवालही रोहित पवारांनी विचारलाय... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola