Satara Heavy Rain : सातारा जिल्ह्यात पावसाने पेरण्या रखडल्या, शेतकरी संकटात
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४० टक्के हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला ८७ टक्के पेरणी झाली होती, यावर्षी ४७ टक्के पेरणी रखडल्याचे चित्र आहे. शेतात सतत पाणी साचल्याने वापसा झालेला नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीन, बाजरी, मका, कडधान्ये आणि घेवड्याची पिके तसेच डोंगरी भागातील भाताची लागवड थांबली आहे. एका शेतकऱ्याने सांगितले की, "माझ्या शेतात कमीत कमी दहा ट्रॉल्या शेंगकट टाकून दहाच्या दहा ट्रॉल्या शेंगकट पूर्ण वाहून गेलं ते नुकसान झालंय. तिसरी गोष्ट मी सोयाबीन पिके असतं विकत आणू दि बियाणं मी दरवर्षी सोयाबीन पिक विकत यानं विकत आणतो त्यात आणलेलं पिक ही माझं वाया गेलंय." शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा सवालही शेतकरी विचारत आहेत.
Continues below advertisement