Khalid Ka Shivaji Row | 'Khalid Ka Shivaji' वाद, प्रदर्शन रोखण्यासाठी सरकारचं पत्र
Continues below advertisement
खालिद का शिवाजी' या चित्रपटावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांनी चित्रपटाच्या कथेत शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं सादर केल्याचा आरोप केला आहे. हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते थांबवण्याची विनंती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी सांगितले की, “माझा चित्रपट हा ऐतिहासिक चित्रपट नाहीये. ही हा ऍक्च्युली हा खालिद हे जे पात्र आहे याच्या अवती भवती फिरणारी कथा आहे आणि खालिदच्या या त्या जर्नीवर ही फिल्म आहे.” सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या चित्रपटाची माहिती घेणार असल्याचे म्हटले आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते, रायगडावर मशीद होती असे दावे करण्यात आले आहेत. या दाव्यांवरुन आक्षेप घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement