Arif Mohammad Khan: केरळचे राज्यपालच बसले दोन तासांच्या धरण्यावर, केरळच्या सीएमवर राज्यपालांचा संताप

Continues below advertisement

Arif Mohammad Khan : केरळचे राज्यपालच बसले दोन तासांच्या धरण्यावर, केरळच्या सीएमवर राज्यपालांचा संताप  
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आज दोन तास धरण्यावर बसले होते. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राज्यपाल एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथं SFIचे काही कार्यकर्ते आंदोलन करत होते. आंदोलन हिंसक झालं आणि कार्यकर्ते खान यांच्या गाडीवर धावून गेले. पोलीसही त्यांना अडवू शकले नाहीत. यामुळे खान प्रचंड चिडले, आणि गाडी थांबवून ते एका चहाच्या दुकानात धरण्यावर बसले. आताच्या आता अमित शाहांना किंवा मोदींना फोन लावा, असं ते रागा-रागात म्हणत होते. अखेर दोन तासांनी अजामीनपात्र कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, आणि एफआयआर खान यांना दाखवण्यात आला, तेव्हा ते तिथून रवाना झाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram