Kedarnath Door Open : केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित

Continues below advertisement

Kedarnath Door Open : केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित

आज महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ धाम हे एक ज्योतिर्लिंग आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांना एक मोठी बातमी देण्यात आली आहे, ती म्हणजे, महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोबत या शुभ मुहूर्तावरच चारधाम यात्रा देखील सुरू होईल.

केदारनाथ धाम दरवाजा उघडण्याचा शुभ मुहूर्त

27 एप्रिल : ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून बाबा केदार यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
28 एप्रिल : पालखी गुप्तकाशीला पोहोचेल.
29 एप्रिल : पालखी फाट्यावर पोहोचणार.
30 एप्रिल : पालखी गौरीकुंडात पोहोचेल.
1 मे : पालखी केदारनाथला पोहोचेल.
2 मे : भाविकांसाठी केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी 7 वाजता उघडले जातील.

यावर्षी केदारनाथ धामचे दरवाजे 2 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. या शुभ मुहूर्तावर दरवाजे उघडून चारधाम यात्रा सुरू होईल. हा प्रवास केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर निसर्गसौंदर्याचा अद्भुत संगमही आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola