Water Cut: कल्याण-टिटवाळा पाणीपुरवठा मंगळवारी १२ तास बंद, KDMC ने नागरिकांना केलं महत्त्वाचं आवाहन

Continues below advertisement
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) कल्याण आणि टिटवाळा शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. 'नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा,' असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. येत्या मंगळवारी, ११ नोव्हेंबर रोजी, सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत १२ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या शटडाऊनमुळे कल्याण पूर्वमधील वालधुनी परिसर, कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग परिसर, तसेच टिटवाळा 'अ' प्रभाग क्षेत्रातील मांडा, मोहने, आंबिवली, शहाड, वडवली आणि बंदरपाडा या भागांचा पाणीपुरवठा खंडित होईल. या १२ तासांच्या बंदमुळे दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola