Uddhav Thackeray | अखेर बळीराजाच्या मुलीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला | ABP Majha
साताऱ्यातील काटेवाडीत उद्धव ठाकरेंचं एक वेगळं आणि हळवं रुपही पाहायला मिळालं. आपल्या घरी येण्याचा एका शेतकऱ्याच्या मुलीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला. दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत असताना एका शेतकऱ्याची लेक गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरेंजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. अखेर मुलीची धडपड पाहून उद्धव ठाकरेंनी तिचं मन मोडलं नाही. आपल्याच गाडीत कांचनला बसवत उद्धव यांनी थेट तिचं घर गाठलं.