Kasara Ghat : कसारा घाटात दरड कोसळली, इगतपुरी स्थानकात अनेक प्रवाशांचा खोळंबा
कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे रेल्वे रुळावर माती आलेय. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक ठप्प झालेय. यामुळे अनेक गाड्या इगतपुरी स्थानकात अडकून पडल्या आहेत. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यामुळे रस्ते वाहतुकीचाही खोळंबा झालेला आहे. अनेक नागरिक त्यामुळे रेल्वे स्थानक, बस स्थानकात अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल होतायत.