Karuna Sharma : करुणा शर्मा यांची जामीनानंतर बीड जिल्हा कारागृहातून सुटका ABP Majha

बीड : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. करुणा शर्मा यांना तब्बल 16 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले आहे.

करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मा यांच्यासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने करुणा शर्मांना जामिन मंजूर केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola