
Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत
Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत
Karuna Sharma on SeeShiv Munde : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कोर्टाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलंय. त्यामुळे धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांना पोटगी द्यावी लागणार आहे. दरम्यान, न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने आई करुणा शर्मा यांच्यावर आरोप केले आहेत. सिशिव मुंडे याने धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे. वडिल आईसोबत कठोर असले तरी ते आमच्यासोबत कठोर नाहीत, असं सिशिव मुंडे याने म्हटलंय. शिवाय आईने घरुगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, तिच आम्हा सर्वांचा छळ करते असं देखील सिशिव याने म्हटलंय. यावर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या, मुलगा म्हणालाय ते खरं आहे. धनंजय मुंडे यांचे माझ्या मुलांसोबत चांगलं नात होतं. त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. आजची पत्रकार परिषद माझी आहे, ती कोर्टाच्या निकालावर होती. माझ्या मुला बाळांवर देखील दबाव येतोय. तुम्ह हे समजून घेतलं पाहिजे. मुलांना काय वाटतं आणि मुलांच्या वडिलांना वाटतं की मी मीडियात बोलू नये. किंवा कोर्टात जाऊ नये, असं त्यांना वाटतं. हे 2019 पासून मिडिया ट्रायल सुरु आहे, हे त्यांना छळ वाटतोय.
आमच्या मला-मुलांना हे वाद नको आहेत. ते म्हणतात, तुम्ही कोर्ट केस संपवून टाका. आज निकाल लागलाय, त्याला मी काय करणार? मी याबाबत काय वाईट देखील बोललेले नाही. कोर्टाने निकाल दिलाय, त्याबाबतचं मी बोलत होते. माझ्या नवऱ्याचा सातत्याने मुलाला फोन येत होता, जेव्हा मी मीडियाशी बोलत होते. मी रखेल बनून जगू शकत नाही. मी बोलत राहणार नाही, असंही करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.