Maharashtra Politics: 'जिथे सपोर्ट घ्यायचा आहे, तिथे आम्ही देऊ', Karuna Munde यांची Supriya Sule भेटीनंतर भूमिका

Continues below advertisement
आपला 'स्वराज्य शक्ती सेना' पक्ष स्थापन केल्यानंतर करुणा मुंडे यांनी राजकीय गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुंबईतील वायबी सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीत आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, 'जिथे तुम्हाला वाटते की सपोर्ट घ्यायचा आहे, तिथे आम्ही तुम्हाला देऊ आणि जिथे आम्हाला सपोर्ट द्यायचा आहे, तिथे तुम्ही द्या, असे आमचे बोलणे झाले आहे.' त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करुणा मुंडे महाविकास आघाडीसोबत जाणार की स्वबळावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola