White-Collar Terror: दिल्ली हादरली, लाल किल्ला स्फोटामागे डॉक्टरांची 'D Gang'?
Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाने देश हादरला असून, यामागे एका उच्चशिक्षित डॉक्टर टोळीचा हात असल्याचे समोर आले आहे. या दहशतवादी कटाचा मास्टरमाईंड, डॉ. उमर मोहम्मद, या स्फोटात ठार झाला असून, तपास यंत्रणांनी आतापर्यंत पाच डॉक्टरांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. आदिल, डॉ. मुझम्मिल शकील, आणि डॉ. शाहीन यांचा समावेश असून त्यांना फरीदाबाद आणि लखनऊ येथून ताब्यात घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांनी दहशतवादाची फॅक्टरी उभी केली होती'. या कारवाईत मोठ्या प्रमाणात स्फोटके, ज्यात सुमारे ३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि एके-४७ रायफलसारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवादी मॉड्यूलचे संबंध जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement