ABP News

Karta Shetkari : Episode 26 : योग्य निर्णय कसा घ्यावा?। सह्याद्री फार्म्स । भाग २६ | IPH । ABP Majha

Continues below advertisement

Karta Shetkari : Episode 26 : योग्य निर्णय कसा घ्यावा?। सह्याद्री फार्म्स । भाग २६ | IPH । ABP Majha आपल्याला छोटे मोठे निर्णय सतत घ्यावे लागतात. जेव्हा दोनच पर्याय असतात – एक हवे ते मिळवून देणारा आणि एक नकोसा किंवा अपयश मिळेल असा – तर त्या ठिकाणी निर्णय घेणे खूप सरळसोट, सोपे असते! पण प्रत्यक्षात आणि बहुतेक सगळ्या निर्णयात, असे अगदी काळे-पांढरे दोन पर्याय नसतात! जे पर्याय असतात, त्यातल्या प्रत्येकाचे काही फायदे असतात आणि काही तोटे! आणि आपल्याला अगदी परफेक्ट, आदर्श असा निर्णय घ्यायचा असतो! अशा वेळी खूप गोंधळ उडतो, आपण निर्णय घेणे लांबणीवर टाकत राहतो किंवा पूर्ण विचार न करता निर्णय घेऊन टाकतो! त्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया शिकणे, आत्मसात करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ही प्रक्रिया शिकूया सह्याद्री फार्म्स प्रस्तुत, आवाहन / आय. पी. एच. निर्मित ‘कर्ता शेतकरीच्या’ या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram