Maratha Reservation : राज्य मागासवर आयोग कुणबी समाजाची पाहणी करणार : ABP Majha
Continues below advertisement
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीआधी सगळ्यात मोठी बातमी एबीपी माझाकडे आली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हाधिकाऱ्यांनी कुणबी नोंदीचेे अहवाल आज औरंगाबाद विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीआधी 624 पानांचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये चार प्रमुख मुद्द्यांवरील माहिती देण्यात आली आहे. मराठा समाजाच्या महसूली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी,
निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज आणि इतर कागदपत्रं, तसंच मराठा समाजातील लोकांची वंशावळाची माहिती या अहवालात आहे. सन १३५० म्हणजे कृषी वर्ष १९५४-५५ पर्यंत जिल्ह्यातील बारा गावांमध्ये कुणबी मराठा नोंदी आढळल्या आहेत.
Continues below advertisement