Karta Shetkari : Episode 25 : न्यूनगंडातुन सुटका।सह्याद्री फार्म्स । IPH । ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKarta Shetkari : Episode 25 : न्यूनगंडातुन सुटका।सह्याद्री फार्म्स । IPH । ABP Majha माणूस स्वत:च्या मनात निष्कर्ष काय काढतो यावर न्यूनगंड येणं आणि त्यातून बाहेर पडणं दोन्ही अवलंबून आहे. माझ्यामधल्या कमतरतांमुळे मी कायमचा पराभूत आहे आणि ही परिस्थिती आता बदलणं अशक्य आहे अशा निष्कर्षावर येणाऱ्या व्यक्तीसाठी न्यूनगंडातून बाहेर पडणे अवघड असते. ‘मी कमी’ असा शिक्का मारला की निष्कर्ष बदलतो. त्याला नवीन वाट दाखवली गेली आणि तो त्या वाटेवर चालायला तयार झाला तरच त्यातून बाहेर येणे शक्य होऊ शकते. वेगळेपणाला कमतरता मानणं, त्या कमतरता कायमस्वरूपी आहेत अशी खात्री बाळगणं, कमतरता असणं म्हणजे कमी दर्जाचा माणूस असणं असा समज करून घेणं हे न्यूनगंडाचे कप्पे असतात. न्यूनगंडाच्या विचारातून नैराश्य येऊ शकते. असे नैराश्य कसे ओळखायचे? जाणून घेऊया सह्याद्री फार्म्स प्रस्तुत, आवाहन / आय. पी. एच. निर्मित ‘कर्ता शेतकरीच्या’ या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून. ABP Majha