Karnataka Lockdown:बोहल्यावर चढण्यापूर्वी लॉकडाऊननं वाट अडवली;कर्नाटकातल्या लॉकडाऊनचा वऱ्हाडाला फटका
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
10 May 2021 10:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकामध्ये आजपासून कडक लॉकडाऊन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये एकही गाडी सोडली जात नाही. याआधी कोरोना निगेटिव्ह अहवाल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक असतील तर त्यांना सोडलं जात होतं. मात्र आता कोणत्याही नागरिकाला कर्नाटकमध्ये सोडले जात नाही. यावेळी महाराष्ट्रातून केरळकडे लग्नासाठी जात असलेल्या मुलीला आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील सीमेवरून मागं पाठवलंय. कर्नाटक सरकारने दिलेला पास त्यांच्याजवळ आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आहे. असं असून सुद्धा लग्नासाठी आतमध्ये प्रवेश दिला जात नाही.