Mucormycosis : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर आता मोफत उपचार होणार! आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
मुंबई : कोरोनातून बरे झाल्यानंतर आता अधिकची खबरदारी बाळगणं आवश्यक झाले आहे. कोरोनातून बरे झालेल्या निवडक रुग्णांमध्ये नव्या प्रकारचे साइड इफेक्ट जाणवत आहेत. ‘म्युकोरोमायकॉसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होत आहेत. राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. अशा वेळी रुग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे.