Karitiki Ekadashi 2021 : कार्तिकी एकादशी यात्रेला मंदिर समितीचा हिरवा कंदील, परंतु अंतिम निर्णय शासनाचा
Continues below advertisement
गेल्या 18 महिन्यांपासून वारकरी संप्रदायाच्या तब्बल सहा महत्वाच्या यात्रा कोरोनामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये काहीशी नाराजी होती. यंदाची कार्तिकी यात्रा होण्याचे संकेत राज्य सरकारने दिल्यानंतर आता मंदिर प्रशासन कामाला लागलं आहे. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रा घ्यावी असा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. या यात्रेसाठी 6 नोव्हेंबर रोजी देवाचा पलंग निघणार असून 6 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
Continues below advertisement
Tags :
Pandharpur Kartiki Ekadashi Ekadashi Kartiki Ekadashi 2021 Kartiki Ekadashi 2021 Kartiki 2021 Pandharpur Kartiki Ekadashi