Farmers' Agitation: 'परिणाम वाईट होतील', Karale Guruji यांचा Devendra Fadnavis सरकारला थेट इशारा
Continues below advertisement
विदर्भातील शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि कराळे गुरुजी (Karale Guruji) यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफी आणि पिकांना योग्य हमीभावासाठी आक्रमक झाले आहेत. 'शेतकऱ्याच्या मनातला आक्रोश जर बाहेर आला तर तो इतका भयंकर राहील की याचे परिणाम देवेंद्र फडणवीसचं सरकार सुद्धा भोगू शकणार नाही,' असा थेट इशारा कराळे गुरुजींनी सरकारला दिला आहे. सोयाबीनला ५३२८ रुपये हमीभाव जाहीर होऊनही बाजारात ४००० पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संतप्त आहेत. अतिवृष्टी आणि येलो मोझॅकमुळे आधीच पिकांचे नुकसान झाले आहे, त्यातच कापसालाही भाव नाही. नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमध्ये दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्याने तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली, तर दुसरीकडे शिंदी रेल्वे गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना चर्चेसाठी बोलावले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement