Kalyan Railway : कल्याणच्या शिवाजी चौकात गुडघाभर पाणी, बदलापूर आणि डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस

Continues below advertisement

कल्याण स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झालीये..  कल्याण जवळ लोकल थांबवण्यात आल्या आहेत... त्याचप्रमाणे मुंबई आणि कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.. 

जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या उत्तरार्धात सगळी कसर भरुन काढली आहे. पाणीकपातीचा सामना करत असलेल्या मुंबईतही गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. गेल्या आठवड्यातील विकेंडमध्ये मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला होता. सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या (Mumbai Rain) सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.

हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली असून थोड्याथोड्या अंतराने मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी कार्यालयात आणि दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram