Kalmboli Navi Mumbai : कळंबोलीमध्ये रेल्वे रूळावर पाणीच पाणी

Continues below advertisement

Kalmboli Navi Mumbai : कळंबोलीमध्ये रेल्वे रूळावर पाणीच पाणी    कळंबोली मध्ये मुसळधार पावूस पडल्याने रेल्वे ट्रॅक वर पाणी गेली ४ तास झाले मेंगलोर एक्सप्रेस गाडी रखडली रूळावरील पाणी काढण्याचा रेल्वे कर्मचार्यांचा प्रयत्न पाणी साचलेल्या ठिकाणी जेसीबी - पोकलेन येण्यास अडचण.  मॅन्युअली हाताने काम करावे लागत असल्याने कमावर मर्यादा अजूनही बराच कालावधी लागू शकतो रेल्वे कधी निघेल याबाबत सांशकता असल्याने प्रवाशांकडून नाराजी रेल्वेतून उतरून प्रवाशी मुंबई , ठाणे ला निघाले चार तासापासून गाडी रखडली आहे. रेल्वेत पॅन्ट्री नसल्याने प्रवाशी सकाळपासून उपाशी.. अनेकांना पाणी सुध्दा मिळाले नाही कळंबोलीत ट्रॅकवर पाणी साचले असल्याने गाडी पनवेल स्थानकात का थांबवली नाही.. प्रवांशाचा संतप्त सवाल नवी मुंबईसह पनवेलमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. आदई, सुकापूर भागातील गावात पाणी भरु लागले आहे. रस्त्यावर, सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पनवेल आदई, सुकापूर भागात सोसायटी, घरात पाणी घुसले आहे. गाड्या पाण्यात आर्ध्या डुबल्या आहेत. सोसायटीतील रहिवाशांना घराबाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. कमरेपर्यंत पाणी साचलं आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पुराचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गाड्या अडकल्या आहेत. कार, परिवहन बस बंद पडल्या आहेत. रहिवाशांचे हाल होतायेत.   भारंगी नदीच्या पाण्यात वाहनं गेली वाहून शहापूरमधील गुजरातीबाग, चिंतामणनगर, ताडोबा परिसर आणि गुजरातीनगर या परिसरामध्ये भारंगी नदीचे पाणी घुसल्याने पाच ते सहा फोर व्हीलर आणि वीस ते पंचवीस टू व्हीलर या वाहून गेल्या आहेत. त्यानंतर अनेक फोर व्हीलर आणि टू व्हीलर चे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांमध्ये साधारण तीन फुटापर्यंत भारंगी नदीच्या पुराचे पाणी गेले आहे. त्यामुळं अनेक घरांचे नुकसान झालं आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरामध्ये नदीला बांधण्यात आलेली संरक्षण भिंतीमुळं खाली जाणारे पाणी हे अडून राहते आणि त्यामुळे येथील भागाला पुराचा फटका बसलेला आहे. नगरपंचायत आणि काही ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने यांच्या फायद्यासाठी हे नदीला संरक्षण कटरे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळं येथील नागरिकांचेमोठे नुकसान झाले आहे. हा कटरा त्वरित तोडण्यात यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram