Justice Varma Impeachment | न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याचा प्रस्ताव स्वीकारला - लोकसभा अध्यक्ष

Continues below advertisement
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर लोकसभेमध्ये चर्चा झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा प्रस्ताव स्वीकारल्याचं जाहीर केलं. हा प्रस्ताव आता राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास कोर्टाचे मुख्य न्यायाधीश मनिंदर मोहन श्रीवास्तव आणि कर्नाटक हायकोर्टाचे वरिष्ठ अधिवक्ता बी. व्ही. आचार्य यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील कारवाईच्या पुढील टप्प्याला यामुळे सुरुवात झाली आहे. ही समिती प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल सादर करेल. समितीच्या अहवालानंतरच राष्ट्रपती या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतील. भारतीय न्यायव्यवस्थेतील हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola