Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कार

Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कार

रामनाथ गोयंका एक्सेलन्स इन जर्नलिझम पुरस्कार एबीपी माझाचे पुणे प्रतिनिधी मनदार गोंजारी यांना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. आमली पदार्थांच्या तस्करी बाबत त्यांनी तीन महिने केलेल्या न्यूज रिपोर्टिंगची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आमली पदार्थांच्या तस्करी कनेक्शन कसं आहे? त्यामध्ये सरकारी रुग्णालय, तुरुंग प्रशासन आणि पोलीस दलातील अधिकारी कसे सहभागी आहेत या सर्वांचा समाजावर कसा विघातक परिणाम होतोय हे मंदार गोंजारी आणि बातम्यांच्या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला होता.

हे ही वाचा,,
 राज्यातील मंत्री व आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असून गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर, मंत्री जयकुमार रावल यांच्यावरही माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता. राज्यातील नेतेमंडळींवर होत असलेल्या आरोपांवरुन विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. त्यातच, आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 34 एकर जमीन (Land) लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे आरोप करताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे. त्यामुळे, आता आमदार पडळकर आणि सरकार यावर काय उत्तर देते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola