ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025

खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) सध्या वादाचं कारण बनली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या हिंदुत्त्ववादी संघटनांनी ही कबर हटवावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी तसेच वेगवेगळ्या पक्षांनीही ही कबर हटवावी अशी मागणी केलीय. दरम्यान, एकीकडे हा मुद्दा चर्चेचा विषय बनलेला असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्वीटची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या होणार आहे, असं म्हटलंय. 

प्रकाश आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलंय? 

प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच एक्स या समाजमाध्यमावर औरंगजेबाच्या कबरीवर एक भाष्य केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली आहे. 'ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवत आहेत. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे. 2026 साली होणाऱ्या  निवडणुकीत भाजपा-आरएसएस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत. होय तुम्ही खरं वाचलंय. औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार आहे. 2026 साली निवडणूक होणार आहे,' असं प्रकाश आंबेडकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola