Jitendra Awhad Thane : आव्हाडांच्या घराबाहेर राडा; पोलिसांचा कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

Jitendra Awhad Thane : आव्हाडांच्या घराबाहेर राडा; पोलिसांचा कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रसत्त्यात हल्ला झाला आहे. तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरुन हा हल्ला करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली होती. संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज ठाण्याच्या दिशेला जात असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबईत पी डिमिलो रोड येथे ही घटना घडली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram