Jitendra Awhad Speech On Akshay Shinde : अक्षय शिंदेंच बनावट एन्काऊंटर, मग पोलिस गुन्हा दाखल का करत नाही?

Continues below advertisement

Jitendra Awhad Speech On Akshay Shinde : अक्षय शिंदेंच बनावट एन्काऊंटर, मग पोलिस गुन्हा दाखल का करत नाही?
लढाई गर्दी नाही तर दर्दी लढत असतात. गर्दीवर काही नसतं. आपण कोणत्या जाणिवेतून लढाई लढतो हे महत्वच  वाल्मिक कराड आजारी आहे म्हणतात माझ्या माहितीनुसार तो आरामात रुग्णालयात झोपला आहे. आता त्याला मोठे आजार होतील आणि तो मस्त आराम करेल माझ सांगणं आहे की सोडूनच द्या ना त्याला धनजय मुंडे याला सत्तेत ठेऊन तुम्ही कराडची चौकशी करत आहात. असं कसं चालेल? मला कळत नाही की वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात? त्यांच्याकडे काही कुणाचे व्हिडिओ आहेत का? त्यामुळेच सगळे घाबरतात का त्याला इतक्या निर्घृण हत्या होते तेव्हा पोलिस काय करतात जनतेची मेमरी शॉर्ट असते, ते विसरून जातील या विचारातूनच घटना घडतात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात अजून गुन्हा दाखल नाही मुंबईचे पोलिस काय करू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे..  त्या दोन लहान मुलांना पाहिलं की समाजातील संवेदना संपल्या की काय असा प्रश्न निर्माण होतो  सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने १० लाख रुपये परत पाठवले. तिने घेतले नाहीत तिने सांगितलं की माझा मुलाला पैसे नकोत त्याला न्याय द्या. महाराष्ट्रातील कुणीही सांगव. सोमनाथ सूर्यवशी मेला कसा? सोमनाथचा मृत्यू जेलमधे झाला आहे. त्याचा श्वासोच्छ्वास मुळे मृत्यू झाला असं सांगण्यात आलं परंतु त्याच्या कुटुंबाच म्हणन आहे की, असा कोणता त्रास त्याला नव्हतं. अक्षय शिंदे याची निरगृहन हत्या करण्यात अली. अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला तो लपण्यासाठी यांनी अक्षय शिंदेची हत्या केली. अक्षय शिंदे प्रकरणात अद्याप पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नाही.  मुंबईची पोलीस खरी भाई आहे. पोलीस यंत्रणेवर मागच्या ५ वर्षात एवढा दबाव आहे की त्यामुळे त्याला काम करता येत नाही   जितेंद्र आव्हाड ऑन नजीम मुल्ला आमच्या इथे एक खून झाला. त्याठिकाणी असणारे ठाकरे नावाचे अधिकारी यांनी मुख्य आरोपी पर्यंत पोहोचले. परंतु मंत्रालयातील एका मंत्र्याने मोठ्याने त्या पोलीस अधिकाऱ्याला शिव्या घातल्या आणि त्याची दुसऱ्याच दिवशी बदली केली. महत्वाची बाब म्हणजे संबंधित अधिकाऱ्याच्या बदलीची ऑर्डर आरोपीने स्टेट्सला ठेवली होती

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram