Jitendra Awhad : सनातन धर्म विकृत, भारताचं वाटोळं केलं; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य ABP MAJHA
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'सनातनी दहशतवाद' या वक्तव्यानंतर आता आव्हाडांनी सनातन धर्मावर आणखी एक विधान केले आहे. आव्हाडांनी 'सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं' असे म्हटले आहे. सनातन धर्म आणि सनातनी विकृत आहेत, हे बोलताना कुणी घाबरू नये, असेही आव्हाडांनी सांगितले. आव्हाडांनी सनातन धर्मानं शिवरायांना राज्याभिषेक नाकारला आणि छत्रपती संभाजीराजेंना बदनाम केले, असे दाखले दिले. आव्हाडांनी 'सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल' असेही म्हटले आहे. 'सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता, आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत' असेही आव्हाडांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या विधानावर भाजपा आमदार राम कदमांनी टीका केली आहे. नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे, असे राम कदम म्हणाले.