Jitendra Awhad Mumbra : मी त्यांच्या पायापाशी आहे तेच बरंय..आव्हाडांचा अर्ज भरायला शरद पवार उपस्थित
Jitendra Awhad Mumbra : मी त्यांच्या पायापाशी आहे तेच बरंय..आव्हाडांचा अर्ज भरायला शरद पवार उपस्थित
हे ही वाचा
बारामती मतदारसंघात लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील पवार विरूध्द पवार अशी लढत होणार असल्याचे संकेत आता दिसून येत आहेत. काल(बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली, त्यामध्ये अजित पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात येणार आहे. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारच सामना रंगणार असल्याची चिन्हे आहेत. त्याचं कारण म्हणजे लवकरच युगेंद्र पवार यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आत्तापर्यंत एकूण ४० एबी फॉर्म देण्यात आले आहेत.