Jitendra Awhad at Viviana Mall : हर हर महादेव चित्रपटाविरोधात जितेंद्र आव्हाड विवियाना मॉलमध्ये दाखल

Continues below advertisement

हर हर महादेव चित्रपटाच्या निमित्ताने आज ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळासंय. ‘हर हर महादेव’ चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता विविध संघटनांकडून या चित्रपटावर आक्षेप घेतला जातोय. विशेष म्हणजे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं. यावेळी तेथील मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये प्रंचड हाणामारी देखील झाली. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मध्यस्थी केली. पण या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. राष्ट्रवादीच्या या आंदोलनानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना मॉल गाठलं आणि चित्रपटाचा शो पुन्हा सुरू केलाय.. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करून दाखवा असं थेट आव्हान आव्हाडांना दिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram