नागरिकांनो रक्तदान करण्यासाठी पुढे या, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं नागरिकांना आवाहन
मुंबई : राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती ट्वीट करत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहन आव्हाडांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि एनजीओ बंद होत्या. त्यामुळं रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. तर सध्या आता सात ते आठ दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे. त्यामुळे आव्हाडांनी तरूणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
Tags :
Blood Donation Uddhav Thackeray Jitendra Awhad Cm Thackeray Rajendra Shingane BLood Shortage Blood Requirement