Jitendra Awhad PC : भाजपकडून आंंदोलन, नेत्यांकडून विरोध; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण
Jitendra Awhad PC : भाजपकडून आंंदोलन, नेत्यांकडून विरोध; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूल्य रुजावे यासाठी मनुस्मृतीच्या श्लोकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या चर्चेवरून वाद चालू आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोडो फाडला गेला. या घटनेनंतर त्यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. हाच मुद्दा घेऊन भाजपकडून राज्यभरात आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. त्यांच्या प्रतिमेला काळे फासले जात आहे. यावर आता आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. काहीही झालं तरी मी मनुस्मृतीला विरोध करणार, असं आव्हाड यांनी ठणकावून सांगितलंय.97 वर्षांनंतर आम्ही त्याच जागेवर मनुस्मृती जाळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडला गेला. आमच्याकडून चूक झाली. आम्ही त्याच्याबद्दल माफी मागितली. आमच्यावर गुन्हेही दाखल झाले. मला फाशी द्या. मी मनस्मृती आणि सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे. मी मरणाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे. जो जातीभेद, वर्षाश्रम, वर्षाश्रम, स्त्री द्वेषाची बिजे पेरली गेली, आपल्या समाजात स्त्रीला मान्यताच नव्हती. महात्मा ज्योतीबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या. स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही, असे मनुने लिहिलेले आहे. मनू काय बोलतोय त्याबद्दल बोला. जितेंद्र आव्हाड चुकला आहे. मी मोठ्या मनाने माफी मागितली आहे.