Patna Opposition Meeting : जेएमएमचे कार्यकर्ते पाटण्यात स्वागतासाठी ढोलपथक तयार
आज देशाचं लक्ष पाटण्यातील घडामोडींकडे लागलंय. कारण आज देशातील विरोधी पक्षनेत्यांची पाटण्यात बैठक होतेय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांची भाजपविरोधात मोट बांधण्याच्या उद्देशनाने ही बैठक बोलावलीय. थोड्याच वेळात म्हणजेच ११ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी खासदार राहुल गांधी सव्वा दहाच्या सुुमाराला पाटण्यात दाखल झाले. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सु्प्रिया सुळे पाटण्यात पोहोचलेत. तसंच, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील खासगी विमानानं पाटण्यात दाखल होणार आहेत. या शिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तसेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह अन्य विरोधी नेते उपस्थित आहेत.