Kalyan ST Depot | खासगी कर्मचाऱ्यांचे हाल, प्रवासासाठी कल्याण डेपोत महिन्याभरापासून रांगा
राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर सर्व ऑफिसेस सुरू करायला परवानगी देण्यात आली. यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलसेवा सुरू झाली. त्यामुळे खासगी कर्मचाऱ्यांवर एसटी प्रवासाची वेळ आली. मिशन बिगीन अगेनला आता महिना उलटला, तरीही खासगी कर्मचारी मात्र बसच्याच रांगेत आहेत. जाताना दोन तास रांग, दोन तास प्रवास, मग आठ तास ड्युटी आणि येताना पुन्हा दोन तास रांग अन दोन तासांचा प्रवास या सगळ्यात हे कर्मचारी पुरते पिचून गेलेत. त्यात बसमध्येही सोशल डिस्टन्सिंग नावाचा प्रकार नसल्यानं कोरोनाचा धोका कायम आहे. मग त्यापेक्षा लोकल सेवाच सुरू केली, तर आमचे हाल तरी कमी होतील, अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.