Jet Airways कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात, काहींना बिनपगारी रजा; का घेतला निर्णय?
Continues below advertisement
बातमी आहे जेट एअरवेजबाबत. एकीकडे जेट एअरवेज पुन्हा सुरु करण्याची योजना असताना या कंपनीच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आलीय किंवा त्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्यात आलंय. कंपनीचे सीईओ संजीव कपूर यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी 1 डिसेंबरपासून या उपाययोजना करण्यात येणार आहेत. जेट एअर लाईन्सचे अडीचशे कर्मचारी आहेत. त्यापैकी कुणालाही नोकरीवरून काढण्यात येणार नाही. पण काही जणांना बिनपगारी सुट्टी देण्यात आलीय तर अनेकांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आलीय. 2019 मध्ये कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजची सेवा बंद करण्यात आली. गेल्या वर्षी जेट एअरवेज पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला आणि त्याला मान्यताही मिळाली आहे.
Continues below advertisement