Jejuri | चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई
चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जेजुरी गड हा रोषणाईने उजळून निघाला आहे.ही दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहेत. 15 ते 20 डिसेंबर पर्यंत हा उत्सव चालणार आहे. 14 तारखेला सोमवती अमावस्या होती. त्या दिवशी खंडेरायची यात्रा भरते परंतु यंदाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. 12 ते 14 डिसेंबर या काळात जेजुरीत जमाव बंदी करण्यात आली होती. त्यामुळं भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नव्हता. मात्र आता दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावं अस आवाहन देखील देवस्थान च्या वतीने करण्यात आलं आहे.