Jayesh Khare Chandra Song Fame : चंद्रा गाण्यातून व्हायरल झालेला चॅम्प जयेश खरे एबीपी माझावर
चंद्रा गाण्यानं सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला लिटील चॅम्प जयेश खरेला मोठा ब्रेक मिळालाय... शाहीर साबळेंच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये छोट्या शाहीरांचे गाणे गाण्यासाठी संगीतकार अजय अतुल यांनी जयेशला संधी दिलीए... जयेश हा सहावीत आहे.... पण आता जयेशला महाराष्ट्र शाहीर सिनेमात गाण्याची संधी मिळणार आहे....शाहिरांच्या लहानपणीच्या गाण्यासाठी गायकाच्या शोधात असतानाच जयेशचा व्हायरल व्हीडीओ समोर आला आणि अजय अतुल यांनी गुणवत्ता हेरत त्याला संधी दिली.... दरम्यान जयेश खरेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हीडिओ पाहुयात ज्यामुळे जयेशला महाराष्ट्र शाहीर सिनेमात गाण्याची संधी मिळाली