Jayant Patil Speech MVA Melava : टोलेबाजी,कोपरखळ्या ते विजयाचा निश्चय; मविआची सभा जयंतरावांनी गाजवलं
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्या जोरदार भाषण केले. आगामी विधानसभेची निवडणूक एकजुटीन लढवण्याचा निर्धार त्यांनी केला. विशेष म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा. कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी, मी तयार आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख करून त्यांनी हे आवाहन केले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
भाजपाच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आम्ही 30 शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो. तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.
निवडणूक 1 महिना पुढे ढकलण्यावर विचार सुरू
राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्याला 10 हजार रुपयांचा महिना दिला जातोय. त्यासाठी कामासाठी त्यांनी योजनादूत नेमले आहेत. हा लोकांचा पैसा आहे. अशा योजनांमध्ये राज्याची लूट होत आहे. अडीच वर्ष काय काम केलं ते लोकांपर्यत पोहचवा. होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केलं आम्ही काय केलं? यावर चर्चा करू. विधानसभा निवडणूक 1 महिना पुढे ढकलण्यावर विचार सुरू आहे. लाडकी बहीण योजना आणली, पण पैसा कुठे? IAS अधिकारी मला सांगतायंत साहेब तुम्ही लवकर या. यांचं खरं गद्दारांचं रुप आहे. सरकार पडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले जात आहेत