Jayant Patil : 'माझ्या भावाला ईडीची नोटीस पण, याचा भेटीशी संबंध नाही' - जयंत पाटील
Continues below advertisement
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं राज्यातील राजकारणात पुन्हा काही हालचाली सुरू झाल्यात का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. यावेळी जयंत पाटीलही हजर होते. या भेटीबाबत कुणालाही काही कळवण्यात आले नाही. मात्र आता जयंत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देत ही गुप्त भेट नव्हती असं म्हटलं आहे. त्याचसोबत एका कंपनीच्या व्यवहाराबद्दल माझ्या बंधूंना ईडीटी नोटीस आली. ४ दिवसांपूर्वी ते चौकशीसाठीही गेले होते. ईडीने बोलावले, आवश्यक ती माहिती घेतली. त्याचा आणि कालच्या भेटीचा काही संबंध नाही.असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय
Continues below advertisement