Jayant Patil On sunil Tatkare meet जयंत पाटील म्हणतात माझे राजकारणात बऱ्याच नेत्यांशी चांगले संबंध
Continues below advertisement
Jayant Patil On sunil Tatkare meet जयंत पाटील म्हणतात माझे राजकारणात बऱ्याच नेत्यांशी चांगले संबंध महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही इतर राज्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहे आणि त्याची अनेकदा प्रचिती येते. उत्तरेकडील राज्यांत किंवा दक्षिणेकडील राज्यांत राजकीय विरोधकांचे वैर हे इतक्या टोकाला जातं की ते एकमेकांचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत. पण महाराष्ट्र त्याला अपवाद आहे आणि आताही ते दिसून आलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि सुनील तटकरे एकमेकांच्या गळ्यात पडले आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि फडणवीस हसायला लागले.
Continues below advertisement