Jayant Patil on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना टिकणार नाही, जयंत पाटलांची टीका

Continues below advertisement

Jayant Patil on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना टिकणार नाही, जयंत पाटलांची टीका

बदलापूर मधील घटनेवरून जयंत पाटील यांनी सरकार आणि पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय. सध्या महाराष्ट्रतील पोलीस झोपलेल्या अवस्थेत असून सरकारचे ऐकल्याशिवाय ते काही करत नाहीत.  कोणती घटना घडली की सरकार पक्षाकडून कुणाचा फोन येतो का याची पोलिस वाट पाहतायत. पण सरकारचे ऐकून देखील  काही पोलीस अधिकारी  निलंबित होतायत, त्यामुळे पोलिसांनी सरकारचे किती ऐकायचे हे लक्षात ठेवावे असेही जयंत पाटील म्हणालेत.  बदलापूर बंदचा नारा देत महाराष्ट्र एकवटायला लागला होता पण सरकार अडचणीत आल्यावर काही विशिष्ट वकील समोर येतायत ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षण बाबत देखील हेच वकील कोर्टात गेले होते, असेही जयंत पाटील म्हणालेत. बदलापूर मधील मुलींवरील अत्याचाराचा निषेध म्हणून  शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघांमध्ये सरकारविरोधात निदर्शने केली.  छत्रपती शिवाजी महाराज चौकात  तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात  ही निदर्शने केली  गेली. महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर हा बंद मागे घेण्याची घोषणा आघाडीकडून रात्री करण्यात आली आहे. बंद मागे घेण्यात आला असला तरी तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात  निदर्शने केली . 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram