अलमट्टी धरणाबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांना भेटणार
Continues below advertisement
कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. कर्नाटकातील हिप्परगी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून 1 लाख 31 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिप्परगी धरणातील विसर्ग वाढवल्याने पंचगंगासह कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट होण्याची शक्यता आहे. काल धरणातून करण्यात आला होता 59 हजार क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला होता. तर अलमट्टी धरणाबाबतही आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यात बैठक होणार आहे.
Continues below advertisement