Jayant Patil Meet Madan Bhosale : जयंत पाटील आणि मदन भोसलेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा

Continues below advertisement

Jayant Patil Meet Madan Bhosale : जयंत पाटील आणि मदन भोसलेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटावर आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन पाटील यांची भेट घेतली.

जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या घरी गेले होते. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या भेटीत जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्यासमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा, अशी शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मदन भोसले हे शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जयंत पाटील हे मदन पाटील यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र, त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत, अशी मोघम प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, आता मदन भोसले भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गोटात दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना शरद पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा सुरु आहे. यापैकी कोल्हापूरमध्ये समरजीत घाटगे यांनी आपण शरद पवार गटात जाणार, हे जवळपास स्पष्टच केले आहे. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील, मदन भोसले हे हातात तुतारी धरतील, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. याशिवाय, अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे तेदेखील लवकर शरद पवार गटात जातील, अशी चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर शरद पवारांनी टाकलेले हे डाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला जेरीस आणतील, अशी चिन्हे आता दिसत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram