Jay Pawar Election : अजित पवारांचे चिरंजीव जय पवार निवडणुकीच्या रिंगणात?

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 'अजित पवारांची जनरेशन नेक्स्ट (Generation Next) या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना आपल्याला दिसतेय', अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याआधी अजित पवारांचे दुसरे पुत्र पार्थ पवार यांनीही निवडणुकीत नशीब आजमावले होते. आता जय पवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. शरद पवार यांचे वर्चस्व राहिलेल्या बारामती नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. विधानसभा निवडणुकीत जय पवार यांनी वडील अजित पवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता आणि आता ते स्वतः निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola