Powai Encounter: 'आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला', Rohit Arya प्रकरणी पोलिसांचा दावा
Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे मुलांना ओलिस धरल्यानंतर पोलीस एन्काऊंटरमध्ये (Police Encounter) मारल्या गेलेल्या रोहित आर्यच्या (Rohit Arya) शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. 'रोहित आर्यच्या छातीमध्ये गोळी लागली आणि ती त्याच्या पाठीतून थेट बाहेर पडली,' ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे जे. जे. रुग्णालयातील (JJ Hospital) शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. शुक्रवारी उशिरा हे शवविच्छेदन करण्यात आले. तत्पूर्वी, ओलिस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्याच्या ऑपरेशन दरम्यान, रोहित आर्यने पोलिसांवर एअर गनने (Air Gun) गोळीबार केला. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी (Self Defence) प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आर्य जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement