Jay Pawar Karjat Jamkhed : Rohit Pawar यांच्या मतदारसंघात जय पवार यांचा दौरा ABP Majha

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आज कर्जत येथे येऊन काही कार्यकर्त्यांची भेट घेतली तसेच कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी काही निवडक कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. मात्र जय पवार यांच्या कर्जत दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली असून काही दिवसांपूर्वीच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जे सुतोवाच केले होते की माझ्याही मतदारसंघात अजित पवार निवडणुकीची चाचपणी करत आहेत या वक्तव्याला आता दुजोरा मिळाला असून जय पवार यांचा अचानकपणे विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जत दौरा हा आता चर्चेचा विषय झाला आहे तसेच यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलवले म्हणून भेटण्यासाठी आलो होतो आणि जर मला पुन्हा बोलवलं तर मी पुन्हा येईल असे वक्तव्य ही जय पवारांनी केले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola