Janmanch On Sinchan Ghotala : सिंचन घोटाळ्यात काहीतरी आढळलं असावं, जनमंचची सूचक प्रतिक्रिया

Continues below advertisement

Janmanch On Sinchan Ghotala : सिंचन घोटाळ्यात काहीतरी आढळलं असावं,  जनमंचची सूचक प्रतिक्रिया

आर आर पाटलांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची परवानगी देऊन केसाने गळा कापला... अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सिंचन घोटाळा प्रकरणी गेले अनेक वर्ष न्यायालयीन लढा लढणाऱ्या जनमंच या संघटनेची अत्यंत सुचक प्रतिक्रिया... म्हणे तत्कालीन गृहमंत्र्यांना सिंचन घोटाळा प्रकरणी काही आढळलं असेल म्हणूनच परवानगी दिली असावी..

आर आर पाटील यांनी सिंचन घोटाळा प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री म्हणून खुल्या चौकशीची परवानगी का दिली याचा स्पष्टीकरण द्यायला आज जरी आर आर पाटील स्वतः हयात नसले, तरी आम्हाला वाटतं की निश्चितच त्यांना तेव्हा त्या प्रकरणात काही आढळलं असेल, म्हणूनच त्यांनी खुल्या चौकशीच्या परवानगीच्या फायलीवर स्वाक्षरी केली असावी असं मत जनमंच या संघटनेने व्यक्त केलं आहे... विशेष म्हणजे राज्यात सिंचन घोटाळा प्रकरणी आवाज उठवणाऱ्या आणि त्यानंतर त्या संदर्भात न्यायालयीन लढा देणाऱ्या संघटनांपैकी एक प्रमुख संघटना आहे...

नुकतच तासगावच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत आर आर पाटलांनी सिंचन घोटाळा संदर्भात खुल्या चौकशीच्या परवानगीच्या फाईलवर स्वाक्षरी करून एका प्रकारे केसाने गळा कापण्याचा डाव खेळल्याचा गंभीर आरोप केला होता...

त्यासंदर्भात एबीपी माझा ने जनमंच या संघटनेची प्रतिक्रिया जाणून घेतली... तेव्हा जनमंच चे विद्यमान अध्यक्ष राजीव जगताप म्हणाले की त्यावेळेस आर आर पाटलानी असा निर्णय का घेतला याचा स्पष्टीकरण आज ते स्वतः देऊ शकत नसले. तरी सिंचन घोटाळा संदर्भात बरेचशे पुरावे होते, तेव्हा ते न्यायालय समोरही मांडले गेले होते. कदाचित त्याच पुराव्यांच्या आधारे आर आर पाटील यांनी खुल्या चौकशीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज आज काढता येऊ शकतं असे राजीव जगताप म्हणाले..

आर आर पाटील यांना त्या फाईल मध्ये खरंच तथ्य आढळले होते आणि त्या आधारावर त्यांनी खुल्या चौकशीला परवानगी दिली होती की त्यांना खरंच राजकीय दृष्ट्या कोणाचा गळा केसाने कापायचा होता याबद्दल आम्ही भाष्य करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे...

आजही जनमंची याचिका उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असून लवकरच ती न्यायालयात सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे आम्ही आधीच सिंचन घोटाळा संदर्भातले सर्व तपशील न्यायालयासमोर मांडले असून त्याद्वारे विदर्भाच्या शेतकऱ्यांना एक दिवशी नक्कीच न्याय मिळेल असा विश्वासही जनमंचने व्यक्त केला आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram