Hindu Jana Akrosh Morcha Rahuri : सकल हिंदू समाजाकडून राहुरीत जन आक्रोश मोर्चा, नितेश राणेही दाखल

सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे.गेल्या काही दिवसांपासून धर्मांतरण आणि लव्ह जिहादचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे देखील या जनआक्रोश मोर्च्यात सहभागी होणार आहेत.. 
मोर्चासाठी वायएमसी मैदानावर आता गर्दी होण्यास सुरवात झाली असून पुढच्या काही वेळेत या ठिकाणाहून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे..  राहुरी शहराबरोबर राहुरी तालुका कडकडीत बंद ठेवत नागरिक मोर्चात सहभागी होतायत.. वाय एम सी मैदानावर भगवं वादळ तयार झाल्याचं दिसून येतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola